मुलांच्या संघात ‘सुबोध’ तर मुलींच्या संघात ‘अनुश्री’ने मारली बाजी
यवतमाळ : राष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल स्पर्धा जळगाव येथील छत्रपती
शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडल्या. सतरा वर्षे खालील ६८ स्कूलगेम
सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपमध्ये यवतमाळ येथील नाठाळ इंग्लिश मीडियम
स्कूलचे दोन खेळाडू सुवर्णपदाचे मानकरी ठरले. यामध्ये मुलांच्या
संघात सुबोध रितेश अंबागडे तर मुलींच्या संघात अनुश्री राठी यांचा समावेश आहे.
सुबोध हा ऑटो चालकाचा मुलगा आहे.
सतरा वर्षे खालील ६८ स्कूलगेम सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप महाराष्ट्रातील
जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खेळल्या गेली. या चॅम्पियनशिप मध्ये भारतातील
समस्त राज्यांतून तब्बल मुलींचे २१ संघ तर मुलांचे २५ संघ रणांगणात चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी
उतरले होते. यामध्ये महाराष्ट्रातर्फे सुद्धा, मुलांचा व मुलींचा
एक एक संघ चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी उतरला होता. या संघामध्ये यवतमाळ येथील अनुक्रमे
मुलांच्या संघात सुबोध रितेश अंबागडे तर मुलींच्या संघात अनुश्री राठी यांचा समावेश
होता. सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंचे नाठाळ इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य नितीन नाठाळ, शिक्षकवृंद, महेश पांडे, प्रदीप देशमुख, जॉय नाठाळ, यवतमाळ जिल्हा
सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. विकास टोणे, नरेंद्र फुसे, नरेंद्र तरोणे, जिल्हा क्रीडा
अधिकारी घनश्याम राठोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक
मंगेश गुडदे, क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र संघाने मारली बाजी
या चॅम्पियनशिपच्या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अशा बलाढ्य संघाशी लढत
झाली. या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राने बाजी मारत चॅम्पियनशिप जिंकली. या चॅम्पियनशिप
जिंकण्यामध्ये महाराष्ट्राच्या संघात यवतमाळची अनुश्री अनिल राठी हे ने मोलाची कामगिरी
करत, चॅम्पियनशिप जिंकली. ही महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करीत
होती. चॅम्पियनशिप जिंकून ती सुवर्णपदकाने सन्मानित झाली.
ऑटो चालकाच्या मुलाने केले प्रतिनिधीत्व
मुलांच्या अंतिम सामन्याच्या लढतीत महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड
अशा सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारली. या महाराष्ट्राच्या संघात यवतमाळचा सुबोध रितेश
अंबागडे हा प्रतिनिधित्व करीत होता. तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. विशेष म्हणजे तो सामान्य कुटुंबातील असून एका ऑटो चालकाचा मुलगा आहे.
खेळाडूंनी यांना दिले श्रेय
दोन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय आई-वडील, शारीरिक शिक्षक पियुष चांदेकर, पंकज शेलोटकर, भाकीत मेश्राम, मृणल फुसाटे, निशांत सायरे
यांना दिले.
0 Comments