नागपूरसह मध्यप्रदेशातून गोवंशाची तस्करी : सहा ट्रक जप्त

 ४७ गोवंशाची सुटका : पांढरकवडा पोलिसांची कारवाई

यवतमाळ : राज्यात गो हत्या बंदी असून, माफीयांनी नवीन शक्क्ल लढवित आहे. वाहनामध्ये  जनावर कोंबुन तेलंगणातील कारखान्यात पोहचवित असल्याचे अनेक वेळा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. दरम्यान काल रात्री पांढरकवडा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कोंघारा या गावाजवळ गोवंश घेवून जाणारे ६ ट्रक जप्त केले आहे. या वाहनातून ४७ गोवंशाची सुटका केली असून, त्याना जीवदान दिले आहे.

जप्त केलेले ट्रक

MH-18 BG 5197; MH 14 HG 7617; MH 40 CD 1815 ; MH 48 6554 ; MH 48 AY 8434 ; MH 11 CH 5058: MH 40 N 6554 आदि सहा ट्रक जप्त केले आहे. पांढरकवडा पोलिसांनी रात्री कोंघारा गावाजवळ तिरंगा हॉटेल जवळ हे सर्व ट्रक जप्त केले. या ट्रक मधील १४ व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

१ कोटी ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत प्रति ट्रक १५ लाख प्रमाणे ९० लाख रु चे ट्रक व गोवंश ९ लाख ४०  हजार आणि ९ मोबाईल १ लाख २१ हजार ५०० रु जप्त करण्यात आले असा एकुण १ कोटी ६१ लाख ५०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

येथून होते तस्करी 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून मोठ्या प्रमाणात नागपूर, कामठी, मध्यप्रदेश येथून गोवंश तस्करी होत असुन बोटावर मोजता येणाऱ्या ट्रकवर कारवाई होते. नागपूर सीमेपासून शेकडो वाहने इथपर्यंत येतातच कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments