अरे बापरे ! दुचाकीस्वाराचे राहीले धड, शिर झाले चेंदामेंदा


 यवतमाळ : दिवसेंदिवस अपघातचे प्रमाण वाढले असून, रस्ते, महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा ‘मार्ग’ ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशातच प्रकारे काल सोमवारी रात्रीच्या सुमारास एक इसम आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र सुसाट वेगात असलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये चक्क दुचाकीस्वाराचे शिर चेंदामेंदा झाले असून, धड शिल्लक राहीले. ही भयावह घटना काल सोमवारी रात्रीच्या सुमारास भोसा घाटंजी महामार्गावर घडली.

शैलेश पिसाळकर रा. शितल नगर यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते युसीएनमध्ये केबल ऑपरेटर होते. सोमवारी २० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास धाब्यावर जेवन करुन ते आपल्या दुचाकीने घराकडे जात होते. अशातच भोसा घाटंजी महामार्गाने जात होते. अशातच सुसाट वेगात असलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात भयानक होता की, यामध्ये मानेपासून डोक चकनाचुर झाले असून, फक्त धड शिल्लक राहिले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविला. आज मंगळवारी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. त्याच्यांवर वडगाव येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शैलेश याच्या मागे वडील सदाशिव पिसाळकर सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, आई विमल पिसाळकर, पत्नी वैशाली, मुलगा अनुज, मुलगी गार्गी, भाऊ निलेश पिसाळकर, आशिष पिसाळकर, मनीष पिसाळकर व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 

Post a Comment

0 Comments