प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ : देश-विदेशातील साधू-संतासह हिंदू बांधव करणार स्नान

 मकरसक्रांती ते महाशिवरात्री पर्यत अन्नछत्र
विश्‍व हिंदू परिषदेचा पुढाकार

यवतमाळ : बारा वर्षातून एक वेळा महाकुंभाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रयागराज, त्रिवेणी संगम येथे महाकुंभ होणार आहे. संपूर्ण देश-विदेशातून नागा साधु, संत-महंत, हिन्दू बांधव स्नान कराला येतात. त्यामध्ये त्यांची भोजनाची निशुल्क सुव्यवस्थीत व्यवस्था व्हावी याकरीता विश्व हिन्दू परिषद, विदर्भ प्रांत सेवा विभाग यांच्या माध्यमातुन प्रयागराज येथे मकरसक्रांती ते महाशिवरात्री पर्यत अन्नछत्र (लंगरसेवा) चालविणार आहे अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राम लोखंडे यांनी दिली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय अवधूतवाडी यवतमाळ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.


पुढे बोलतांना ते म्हणाले की, विश्व हिन्दू परिषदेच्या वतिने प्रयागराज येथे मकरसक्रांती ते महाशिवरात्री अन्नछत्र (लंगर) उभारले जात आहे. या अन्नछत्रा मध्ये समस्त श्रध्दाळू यांना भोजन प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. या अन्नछत्र (लंगर) बजरंगदलाचे असंख्य कार्यकर्ते स्वतःहून भोजन प्रसाद तयार करण्यासाठी सेवा देणार आहे. त्याकरीता विश्व हिन्दू परिषद यवतमाळ जिल्हयाच्या वतिने सहयोग अभियान सुरू केले आहे. घरोघरी गावागावातील रामभक्त या अभियानामध्ये धान्य पैशाच्या स्वरूपात सहयोग करणार आहे. धान्याची पहिली खेप 7 जानेवारी 2025 ला सकाळी 10 वाजता अन्नछत्र कार्यालय, अवधुतवाडी, यवतमाळ येथून जाणार आहे. 

लंगरसेवेच्या माध्यमातुन ज्यांना साधु संताच्या महंताच्या भोजन सेवेमध्ये आपला ही वाटा असावा अशी इच्छा आहे अश्या प्रत्येक श्रध्दाळूने अन्नछत्र कार्यालय, अवधुतवाडी, अणे कॉलेज समोर, येथे विश्व हिन्दू परिषदेच्या या निशुल्क लंगर सेवेत सहयोग करावा असे आवाहन विश्व हिन्दू परिषद विदर्भ प्रांत सेवा प्रमुख राम लोंखडे यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष मनोज औदार्य, संतोष हरणखेडे, गोविंद मोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments