यवतमाळ : पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या सुभाष चौकातील
दुचाकीनासमोरून चोरट्याने दुचाकी चोरून नेली होती. पोलिसांनी चौकशी करुन दोन
आरोपींना अटक केली असनू, त्याच्याकडुन तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
नरेश शेषराव टारपे वय 40 वर्ष, एकनाथ शेषराव टारपे घप 26 वर्ष दोन्ही
रा. हर्षी ता. पुसद असे आरोपीचे नाव आहे. यादव सुर्यभान
खोकले वय 47 वर्ष रा. घाटोडी ता पुसद हे दि. 23 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजताचे सुमारास MH-29-B.N.-6309 क्रमांकाच्या दुचाकीने विकानेर समोर, सुभाष चौक, पुसद, येथे गेले. त्या ठिकाणी दुचाकी उभी करुन दाठि-कंटीग करण्याकरीता गेले
होते. अशातच चोरट्याने मोटर सायकल चोरून नेली. या प्रकरणाची फीर्याद नरेश टारपे यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे
दिली. त्यावरुन अप.क्र. 30/2025 कलम 303 (2) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस स्टेशनचे पुसद
शहरचे डी. बी. पथकांनी बातमीदार व सी. सी. फुटेजचे आधारे
प्राप्त माहितीवरुन आरोपी निष्पन्न केले. सापळा रचुन आरोपी नरेश शेषराव टारपे वय 40 वर्ष, एकनाथ शेषराव टारपे घप 26 वर्ष दोन्ही
रा. हर्षी ता. पुसद जि. यवतमाळ यांना ताब्यात घेतले. पुसद शहरातुन चोरलेल्या मोटर सायकल शेतातील गोठ्यात
लपवुन ठेवल्याचे सांगीतले. त्यांचे कडुन तीन मोटर सायकल किमंत
1,65,000/-
रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस
अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी
पुसद हर्षवर्धन वि.जे. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धिरज बांडे यांच्या सुचने प्रमाणे
पोउपनि किशोर खंडार, पो.हवा प्रफुल इंगोले, पो. हवा. मनोज
कदम, पोकों, आकाश बाभुळकर, पोकॉ. शुध्दोधन
भगत, चालक पोहवा. अमीत मैदंळकर यांनी केली आहे.
0 Comments