अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उपयोजित परमाणू विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुजाता काळे यांच्या ‘फॅब्रिाकेशन अॅन्ड कॅेरक्टेरायझेशन ऑफ मेमरी युजिंग 6 बाय 6 अॅरी ऑफ मेमरीस्टर्स’ या विषयावरील संशोधनाला भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने पेटेंट मंजूर केले आहे. त्यांच्या समवेत डॉ. उज्ज्वला बेलोरकर यांनी सुध्दा याच विषचावर संशोधन केले आहे. भारतीय नॅनो इलेक्ट्रॉनिक्स युजर प्रोग्राम अंतर्गत आय.आय.टी. बॉम्बे येथे पॅसिव्ह एलिमेंट मेमरीस्टर्स वापरुन सेमीकंटक्टर आधारित नॅनो मेमरी विकसित केली. संशोधनाकरीता त्यांनी मटेरियल युज्ड, डीव्हाइस डायमेन्शन (जाडी) हिस्टरेसिस कव्र्ह इत्यादी पॅरामीटर्स यासाठी वापरण्यात आले. या संशोधनामुळे मेमरिस्टर्सना नॉन-व्होलॅटाइल सॉलिड-स्टेट मेमरी बनविता येते. ज्यामुळे हार्ड ड्राइव्हपेक्षा जास्त डेटा घनता मिळू शकते. डॉ. सुजाता काळे यांना भारत सरकारचे पेटेंट मिळाल्याबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments