‘झेडपी’ शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षकांचा एल्गार

 न्यायासाठी धरणे आंदोलन, आ. बाळासाहेब मांगुळकरांनी दिली भेट 

यवतमाळ : ‘झेडपी’च्या शिक्षण विभागात मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहे. शिक्षण विभागात सुरु असलेल्या अनागोंदी विरोधात आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी एल्गार पुकारुन जि.प. समोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या एक दिवस धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली. शिक्षकांच्या मागण्यांसाठी सकारात्मक पाठपुरावा करणार असून, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी आश्‍वस्त केले.
शिक्षकांच्या मागण्या :

३३% विषय शिक्षकांना तातडीने वेतोन्नती मिळावी.विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी अचूक सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करावी.उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी. माध्यमिक शिक्षकांची पदे तातडीने पदोन्नतीने भरावी. मुख्याध्यापक पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करावी. केप्र किंवा उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर असलेल्या पदवीधर शिक्षकांच्या कपात झालेल्या वेतनवाढीचा अहवाल शासनाला सादर करावा. मराठी/हिंदी भाषा सूटचे आदेश त्वरित लागू करावेत. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निकाल त्वरित लावावा.

आंदोलन करणारे शिक्षक

यावेळी महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक,व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा शाखा यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर, डॉ.प्रकाश गुल्हाने, अनिल पखाले, महेंद्र शिरभाते, बळीराम राठोड, रवींद्र बोबडे, महेश खोडके, देवराव डेबरे, मनीष लढी, कुणाल नवरे, राजेश बोबडे, देवेन्द्र ठाकरे, सचिन गायकवाड, कापरतीवार, नरेंद्र परोपटे, राजेश ढगे, गोपाळ यादव, राजेश उरकुडे, विकास दरणे, रुपेश हिवरकर, अशोक राऊत, राजेश जुनघरे, अरुण महल्ले, डॉ. प्रीती स्थूल, भावना राऊत, संगीता चुनारकर, अश्विनी डाखोळे, संपदा हिरोळे, लता डेबरे, जया झलके, विद्या राऊत, नागोराव ढेंगळे, गजानन जेऊरकर, पावडे, जीवने, रमेश बोबडे, महेश ओतकर, विठ्ठल पारखे, विजय कन्नावार, सुनील थुल, संजय कुकडे, प्रीती स्थूल, रवींद्र नंदुरकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments