बॅक फोडणारा अट्टल चोरटा जेरबंद

चार घरफोडीचा पर्दाफाश, महागाव पोलिसांची कारवाई


यवतमाळ : महागाव येथील बॅक, घरफोडी करणा-या अट्टल चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले. सदर चोरट्यांनी महागाव
, बिटरगाव व दराटी हद्दीत चार घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी एकुन २,७७,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. महागाव पोलिसांनी ही कामगिरी केली.

ओंकार माधव फोफसे वय २५ वर्ष रा. वार्ड क्र. १४ महागाव असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हे बाहेर गावी असता कोणतरी अज्ञात चोरटयानी घराचे कुलूप कोंडा तोडुन कपाटातील सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असा एकु,१३,००० रु चा मुद्देमाल चोरुन नेला आहे. फिर्यादीचे रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद असुन तपासावर आहे. तसेच इसाफ स्मॉल फायनन्स बँक महागाव येथील बचत गटाची वसुली झालेली ३,५३,३८३/- रु. तिजोरीत ठेवली. दि. ३ डिसेंबर २०२४ रोजीचे रात्रीचे दरम्यान बँकेचे कुलूप तोडले. बँकेचे शेटर बाहेरुन वाकवुन अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. बॅकेची तिजोरी उघडुन त्यातील ३,५३,३८३/- रु. रोकड चोरुन नेलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन आरोपीला अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता आरापीने पोस्टे दराटी हद्दीतील ग्राम चिखली येथील किराणा दुकाण फोडुन त्यातील एक लॅपटॉप चोरल्याचे सांगितले. पोस्टे बिटरगाव हद्दीतील जेवली येथील किराणा दुकान फोडल्याची कबुली दिली.

गुन्ह्याचा पर्दाफाश करणारे पथक

पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली धनराज निळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे महागाव, राजु खार्डे, सपोनि, मिलींद सरकटे, सपोनि, सरस्वती राठोड, सपोनि, सागर अन्नमवार पोउपनि, पोलीस अंमलदार सुशिल चेके, विदया जाधव, बालाजी मारकड, अतिष जांरडे, गजानन खरात, संतोष जाधव, अमित नोळे, दिपक माळी व API प्रकाश तायडे, प्रगती कांबळे व रोशनी जोगडेकर, सायबल सेल यवतमाळ यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments