कुख्यात ‘भित्तम’ MPDA अंतर्गत स्थानबध्द

यवतमाळ : शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या कुख्यात ‘भित्तम’ याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव एस पी यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिका-यांकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी सदर प्रस्ताव मंजुरी दिली असून, आज दि. जानेवारी २०२५ रोजी स्थानबध्दतेचा आदेश पारीत केले. त्या आदेशावरुन अभय उर्फ भित्तम दिलीप पाथोडे वय २३ वर्ष रा. शिंदे नगर, यवतमाळ यास नांदेड जिल्हा कारागृहात १ वर्षा करीता MPDA १९८१ (सुधारना २०१५) नुसार स्थानबध्द करण्यात आले आहे. ‘भित्त्म’याचा गुन्हेगारी अभिलेख सन २०२० पासुन असून त्याचे विरुध्द घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, गंभीर जखमी करणे, जिवेमारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पो.स्टे अवधुतवाडी व यवतमाळ शहर येथे नोंद आहे. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदरची कार्यवाही एसपी कुमार चिंता, ॲडीशन एस पी पियुष जगताप, डीवायएसपी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात पि आय नरेश रणधिर यांचे नेतृत्वात एपिआय मनोज पवार, धैर्यशिल घाडगे, सफौ गजानन वाटमोडे, सुरेश मेश्राम, पोलीस हवालदार विशाल भगत, रवि खांदवे, रुपेश ढोबळे, पो.कॉ. मोहम्मद भगतवाले, पो. कॉ. रशिद शेख, पो. कॉ. प्रतिक नेवरे, पो. कॉ. योगेश चोपडे यांनी केली.  

 

Post a Comment

0 Comments