संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दिक्षांत समारंभ : कुलगुरु डॉ मिलींद बारहाते यांची माहिती
३८ हजार विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करणार
या दीक्षांत
समारंभामध्ये 38,305 पदवीकांक्षींना
व 238 विद्याथ्र्यांना पदविका प्रदान करण्यात
येणार आहे. विद्याशाखानिहाय पदवीकांक्षींची संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा 8973, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 8109, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 14963 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 4123, या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती 456, स्वायत्त
शारीरिक शिक्षण महाविद्यालय (एच.व्ही.पी.एम.),
अमरावती 991 व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती 690 इतक्या पदवीकांक्षींना
सुध्दा पदवी दिल्या जाणार आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र
पदविकाधारकांची विद्याशाखानिहाय संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा 17, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 51, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 19 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 151 अशी आहे.
सुवर्णपदक, रौपय्यपदकासह १६८ पारितोषिकांचे वितरण
या दीक्षांत
समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्याथ्र्यांना
122 सुवर्णपदके, 22 रौप्यपदके व 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पारितोषिकांचे
वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये
देण्यात येणाया पदके/पारितोषिकांसाठी
मुले व मुलींमध्ये सर्वाधिक जी.एस. टोम्पे कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
चांदुर बाजार येथील कु. हर्षाली मधुकरराव हटवार या विद्यार्थीनीला सुवर्ण
06 व रोख पारितोषिक 01 , प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च,
बडनेरा येथील कु. निकीता गोपाल देवचे या विद्यार्थीनीला सुवर्ण 6, तर लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील कु. उत्कर्षा संजय वानरे या विद्यार्थीनीला सुवर्ण 4, रौप्य 1 व रोख
पारितोषिक 2 घोषित झाले
आहेत. 89 विद्याथ्र्यांना पदके देवून गौरवान्वीत केले जाणार असून यामध्ये मुली
67, तर मुले 22 आहेत. यापैकी 2 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक
अशा 3 पदकांसाठी कोणीही
पात्र ठरले नाहीत. वैशिष्ट¬े म्हणजे जास्तीतजास्त पदके प्राप्त करणायांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. प्रथम तीनमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ख-याअर्थाने
ही महिलोन्नोती आहे.
350 संशोधकांना आचार्य पदवी
विद्यापीठांतर्गत
शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून आजपर्यंत 5472 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 350 संशोधकांना
आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवी धारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत एकूण 146 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात
29, भौतिकशास्त्र 6, संगणक विज्ञान 5, प्राणिशास्त्र 10, गणित 14,
परमाणू 4, सांख्यिकी 3, सूक्ष्मजीवशास्त्र 3, वनस्पतिशास्त्र 11, संगणकशास्त्र व अभियांत्रिकी 29, परमाणू अभियांत्रिकी 12, यांत्रिकी अभियांत्रिकी 2, विद्युत अभियांत्रिकी 6, स्थापत्य अभियांत्रिकी 2, माहिती व तंत्रज्ञान 1, रासायनिक तंत्रज्ञान 1, पर्यावरण विज्ञान 1, व भेषजी विज्ञान 7 आदींचा समावेश आहे.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत एकूण 48 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये वाणिज्य विषयात 33, व्यवसाय अर्थशास्त्र 03 व व्यवसाय प्रबंधन 12 आदींचा
समावेश आहे.
मानव विज्ञान
विद्याशाखेत एकूण 118 आचार्य पदवीधारक
असून त्यामध्ये इंग्रजी विषयात 31, मराठी
06, हिन्दी 05, राज्यशास्त्र 09, गृहअर्थशास्त्र 07, संगीत 07,
मानसशास्त्र 03, अर्थशास्त्र
14, समाजशास्त्र 11, भूगोल 06,
इतिहास 13 व विधी 06 आदींचा समावेश आहे.
आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत एकूण 38 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये शिक्षण विषयात 07, शारीरिक शिक्षण 16, ग्रंथालय व माहितीशास्त्र 12, समाजकार्य 02 व गृहविज्ञान
01 आदींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यापीठाच्या
४१
दीक्षांत समारंभामध्ये पदके व पारितोषिके प्राप्त करणाया विद्याथ्र्यांनी सुरक्षितता लक्षात घेता सकाळी 8 वाजेपर्यंत दीक्षांत समारंभास्थळी उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी उपस्थित झाल्यानंतर सभामंडपातील वित्त विभाग
व परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावयाचा असे आवाहन डॉ. मिलींद बारहाते
कुलगुरू, संत गाडगे बाबा
अमरावती विद्यापीठ यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थित अधिकारी
पत्रकार परिषदेला
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू
डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखाधिकारी सीए पुष्कर देशपांडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच सर्व अधिष्ठाते व अधिकारी
उपस्थित होते.
0 Comments