प्रवाशांचे 40 हजार उडवले


यवतमाळ : यवतमाळ येथील बसस्थानकावर प्रवाशाचे 40 हजार रुपये उडवल्याची घटना शुक्रवारी घडली. भिमराव तुळशिराम टोंगे रा. गव्हळा हे यवतमाळ येथील बसस्थानकावरील प्लॅटफॉर्म एक वरुन बसमध्ये चढत असतानांच अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments