यवतमाळ : शहरातील साईनाथ ले आउटमधील
इसम इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारी मुलगी व तीच्या मैत्रिणीला नागपूर-तुळजापूर
मार्गावरील कॉलेजमध्ये सोडण्यासाठी दुचाकीने जात होते. अशातच समोरून येणा-या कारने
दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात इसमासह दोन विद्यार्थीनी जखमी झाल्या आहे. ही
घटना आज ११ वाजताच्या सुमारास नागपूर-तुळाजापुर मार्गावरील कॉलेजच्या वळणावर घडली.
वैष्णवी विनोद अलोने वय 18 वर्ष, वैष्णवी ओशावार वय 18 वर्ष, विनोद अशोक अलोने वय 46 वर्ष रा. साईनाथ ले आउट जुना उमरसरा यवतमाळ अशी जखमींची नावे आहे. विनोद
अलोने यांची मुलगी वैष्णवी अलोणे व तीची मैत्रिण वैष्णवी ओशावार
ह्या जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयात बिई भाग दोनला शिक्षण घेत आहे. आज ७
फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्या दोघांना सोडून देण्यासाठी
एम.एच. २९/ एफ ९२७३ क्रमांकाच्या मोपेड दुचाकीने जात होते. अशातच ११ वाजताच्या सुमारास कॉलेज जवळील वळणावर एम. पी ३५ / सि ए
१९३८ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार
धडक दिली. यामध्ये दुचाकी रोड वरुन दहा फुट रोडच्या खाली सुलपात
घासत नेली. त्यामुळे वैष्णवी अलोने, वैष्णवी
ओशावार, दुचाकी चालक विनोद अलोने हे जखमी झाले असून,
त्यांना शासकीय ररुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी यश विनोद अलोणे याच्या
तक्रारीवरून यवतमाळ ग्रामिण पोलीस ठाण्यात कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला.
0 Comments