वन्यवन्यजीव संरक्षणासाठी रॅपिड रेस्क्यू टीम्सजीव संरक्षणासाठी रॅपिड रेस्क्यू टीम्स स्थापन करा

एम. एच. 29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

यवतमाळ :  जिल्हा समृद्ध वनसंपदेने नटलेला असून, येथे विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे. अलीकडच्या काळात रस्ते अपघातांमध्ये वन्यजीवांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. वेळीच बचावकार्य आणि उपचार न मिळाल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव जातो. गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वनविभागाने रॅपिड रेस्क्यू टीम्स स्थापन केल्या आहे. ज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांचा समावेश आहे. या टीम्सच्या कार्यक्षमतेमुळे तेथील वन्यजीवांच्या बचावकार्याला गती मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही वन्यजीव उपचार केंद्राची स्थापना करून,रॅपिड रेस्क्यू टीम्समध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावी,अशी मागणी एम.एच.29 हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटना,यवतमाळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड यांना दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश मेश्राम, प्रा. पंढरी पाठे, मोरेश्वर मोरे, शुभम तेलगोटे, जीत पाटील, प्रज्वल तुरकाने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments