काळी वनपरक्षेत्रातील कारवाई
यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौ. वनपरिक्षेत्रातील जमिन अवैधपणे जमिन खोदून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. वनविभागाच्या पथकाने २ फेब्रुवारी रोजी रात्री ३ वाजता ही कारवाई करण्यात आली.
गुंज बीट गुंज वर्तुळ काळी वन परिषद अंतर्गत राखीव वन खंड क्र . ८१८ मध्ये अप्रवेश करून जमिनीवर अवैधरित्या खोदकाम करणे तसेच माती दगड मुरूम इत्यादीची अवैध वाहतूक करताना रात्रीचे वेळी एक ट्रक क्रमांक नंबर नसलेला ट्राली माती मिश्रित मुरूम ०२घ .मी .वाहतूक करीत होता. अशातच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी राखीव वनामध्ये जप्त केले. बाबत वन अपराध क्र .० ७४१/ ० १/२०२५दिनांक ०२ /०२ / २०२५नुसार भारतीय वन अधिनियम १९ २७चे विविध कलमान्वे वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे आकाश पांडुरंग कार्लेवाड वय वर्ष 22 राहणार आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यास मोक्यावर मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र इतर आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोक्या वरून पसार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे . जप्त मालमत्ता ट्रॅक्टर एक नग अंदाजे किंमत साडेतीन लक्ष ट्रॉली 70000 / - एक दुचाकी 50000 / - एक मोबाईल इतर साहित्य व माती मुरूम दोन घ .मी .असे अंदाजे एकूण चार लाख 88 हजार ची मालमत्ता जप्त करण्यात आली
सदर कारवाई डॉ. बी. एन. स्वामी उपवनरक्षक पुसद वन विभाग पुसद तथा शशांकदम सहाय्यक वनरक्षक (जंकास व कॅम्पा) पुसद यांचे मार्गदर्शनत सम्राट मिश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी ( प्रादे ) काळी ( दौ ) एस . बी . बदुकले, वनपाल, गुंज डी. जी . सावते वनरक्षक, गुंज , अविनाश डी राठोड , वनरक्षक डी . एस. कोळी , वनरक्षक तथा श्रीकांत डोरले सर्व नरक्षक ह्या यांनी यशस्वीरित्या कारवाई केली आहे .
0 Comments