वैभव
मुंजाजी हिंगडे वय २० वर्ष रा. चातारी ता. उमरखेड असे चालकाचे नाव आहे. दि.२४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत चातारी
बिट परिसरामध्ये मध्यरात्री एक ईसम चारचाकी वाहनाने अवैध
दारु वाहतुक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरुन ग्राम लोहरा येथे सापळा रचुन MH-35-M-306 क्रमांकाच्या
वाहनास थांबविले. चालक वैभव मुंजाजी हिंगडे वय
२० वर्ष रा. चातारी हा चालवित असलेल्या सदर वाहणाची पाहीणी केली. त्यामध्ये देशी दारु १८० मिलीचे १८ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बॉटल अशा
एकुण ८६४ बॉटल किंमत प्रत्येकी ७० रुपये प्रमाणे एकुण ६०,४८० रुपये व चारचाकी वाहन किंमत अं. १,००,००० रुपये असा
एकुण १,६०,४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उमरखेड पोलिस
ठाण्यात अप क.१०९/२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा
नोंद करुन कार्यवाही करण्यात आली.
सदरची
कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,
उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक पो. स्टे. उमरखेड शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली
सपोनी सारीका राऊत, पोकों गिरजप्पा
मुसळे, चालक पोका आकाश यांनी केली. पुढील
तपास सपोनि सारीका राउत हे करीत आहे.
0 Comments