हिवरा येथे आयोजन : भव्य बक्षीसांची लयलुट
यवतमाळ : महागाव तालुक्यातील हिवरा येथे शंकरपटाचे आयोजन २ व ५ फेब्रुवारी रोजी डॉ. राम कदम यांच्या शेतात होणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना विदर्भ केसरी शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये भव्य बक्षिसांची लयलुट राहणार आहे.
धोंडीराव कदम पाटील, दादाराव रंभाजी कदम, ब्रिजलाल जयस्वाल
यांचे स्मृतीप्रित्यर्थ शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. 'अ' गट व 'क' गट अशा दोन गटात
ही स्पर्धा होणार आहे. 'अ' गटामध्ये प्रथम
बक्षीस ६१ हजार दुसरे बक्षीस ४१ हजार, तिसरे बक्षीस ३१ हजार, चौथे बक्षीस
२१ हजार, पाचवे बक्षीस ११ हजार यासह अन्य आठ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच
'क' गटामध्ये प्रथम बक्षीस
२१ हजार, दुसरे बक्षीस १५ हजार तिसरे बक्षीस ११ हजार, चौथे बक्षीस
पाच हजार, पाचवे बक्षीस चार हजार, या सह अन्य आठ
बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण चार लाख रुपयांच्या बक्षिसांची उधळण होणार
आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राम कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक मुकुंद पांडे, माजी सरपंच डॉ.
धोंडेरावजी बोरुळकर, प्रवीण जामकर, सतीश पाटील ठाकरे, आनंदरावजी कदम, श्रीराम महादजी
कदम, अशोकभाऊ जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार विजयराव
बोंबीलवार, शफी शेट सूरया, राजू खोंडे यांची उपस्थिती
राहणार आहे. सदर स्पर्धा शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडणार आहे. पंचक्रोशीतील
शंकरपट शौकिकांनी याचा लाभ घ्यावा. बैलगाडा
शर्यतीचे शौकीन बैल मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ शंकरपट (बैलगाडा) संघटनेचे
अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, ग्रामपंचायत
सदस्य पंजाबराव पाटील कदम यांनी केले आहे.
0 Comments