चिकणी डोमगा येथील शाळेत भावस्पर्श 2025 सांस्कृतिक महोत्सव
यवतमाळ : जिल्हा
परिषद वरिष्ठ प्राथ शाळा चिकणी (डो) येथे भावस्पर्श सांस्कृतीक महोत्सव
2025 आयोजित
करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सुंदर अशी नृत्य व नाट्य
कला विद्यार्थ्यांनी सादर केली. शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषीक
शाळेच्या वतीने वितरीत करण्यात आले. महादीप परिक्षेत विमाणवारीस पात्र विद्यार्थ्यांची
बैलगाडीतून चिकणी गावात मिरवणूक काढण्यात आली. तीन विद्यार्थ्यांना
सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात
आले.
इथेच थिरकतात चिमुकल्यांची पायं!
ते सर्व पाहते कौतुकाने त्याची
माय!
इथेच रचला जातो विकासाचा मळा!,
तिलाच म्हणतात जिल्हा परिषदेची
शाळा!
ते सर्व पाहते कौतुकाने त्याची माय!
इथेच रचला जातो विकासाचा मळा!,
या दरम्यान गावकऱ्यांनी शिक्षकांचा
उल्लेखनिय कार्याबद्दल माथने सरांचा महादीप कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
मुख्याध्यापक पंडीत वैद्य यांनी सुद्धा पात्र
विधार्थी व शिक्षकांचा सन्मान केला. या प्रसंगी बाबु पाटील जैत,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज मेश्राम, उपाध्यक्ष
सुग्रीव बांबोर्डे यांच्यासह सदस्य व गावकरी उपस्थित होते. ग्रामपुत्र
शिक्षक विनोद चव्हाण यांच्या कडून त्यांच्या आईच्या वतीने सर्वांचा
सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मुख्याध्यापक
पंडीत वैद्य, स. शिक्षिका
कल्पना बोंदरे, विषय शिक्षक
मनोज माथने, विषय शिक्षक प्रभुचरण कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments