‘आयएपी’चा पदग्रहन समारंभ थाटात
यवतमाळ
: अखिल भारतीय बालरोग संघटना (आयएपी) यवतमाळचा पदग्रहण समारंभ थाटात पार पडला. यवतमाळ आयएपीच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील भवरे तर सचिवपदी
डॉ. रवीशेखर पाटील यांची निवड करण्यात आली.
अकॅडेमी ऑफ पेडियट्रिक यवतमाळ 2025 करीताचा नवीन कार्यकारणी चा पदग्रहण सोहळा हॉटेल वेणेशियन येथे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडला. यामध्ये डॉ. सुनील भवरे यांनी मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र चव्हाण यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तर डॉ. रवीशेखर पाटील यांनी डॉ. लीना मानकर यांच्याकडून सचिव पदाची सूत्रे स्वीकारली तसेच डॉ. सुबोध तिखे यांनी डॉ. हरीश तांबेकर यांच्याकडून कोषाध्यक्षा पदाचीसूत्रे स्वीकारली आहे.
इंस्टॉलींग ऑफिसरची उपस्थिती
या समारंभामध्ये इंस्टॉलींग ऑफिसर
म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ व आयएपी महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. संजय
पाकमोडे तसेच सचिव डॉ. अमोल पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर
येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उदय बोधनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएपीचे माजी
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. संजय देशमुख,
यवतमाळ येथील आयएपीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. संजीव जोशी,
राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. सचिन पाटील हे मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित
होते.
सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस
अध्यक्ष पद स्वीकारतांना डॉ. सुनील
भवरे यांनी डॉक्टर पेशंट यांचे संबंध सुदृढ करण्याचा तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा
मानस व्यक्त केला. सोबतच कुठले तरी एक गाव दत्तक घेऊन वर्षभर त्या गावांमध्ये
मेडिकल चेकअप तसेच सामाजिक कार्य करण्याचा तसेच केंद्रातून दिलेल्या सगळ्या विशेष ऍक्टिव्हिटीज
मध्ये सुद्धा हिरीहरीने भाग घेण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष
डाँ. सूनिल भवरे यांनी केला आहे. तसेच सर्वाना
सोबत घेऊन आपण सगळे काम करू असे ते म्हणाले.
विविध संघटनेच्या पदाधिका-यांची हजेरी
या कार्यक्रमाचे सूञसंचालन डॉ. स्वाती पाटील व डॉ. ऐश्वर्या गुप्ते ह्यांनी
तर आभार सचिव डॉ. रवीशेखर पाटील यांनीं माणले. ह्या कार्यक्रमाला यवतमाळतील विविध संघटना आय एम ए, यवतमाळ गायनेकॉलोजी सोसायटी, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, निमा
, निमा वडगाव, इंडियन डेंटल असोसिएशन,
इनर व्हील क्लब , आयुर्वेद
महाविद्यालयचे प्राचार्य मुंदाने सर वाय डी सी डी ए, एम आर असोसिएशन, होमिओपॅथी
डॉक्टर असोसिएशन, जेसिज, इत्यादी यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थीती मोठया संख्येने होती.
0 Comments