दारव्हा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
हरिष जाधव / तहलका टाईम न्युज
नेटवर्क
दारव्हा : नगरपरिषद दारव्हा प्रशासनाकडून शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या
हालचाली सुरु होत्या. अखेर आज ७ फेब्रुवारी रोजी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने
जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रम हटविण्यात आले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास
घेतला आहे.
दारव्हा शहरातील पंचायत
समिती सभापती निवास्थान व पोलीस निवासस्थान यामधील अरुंद रस्त्यावर अनेक दिवसांपासुन व्यावसायिकांनी अतीक्रमण करुन दुकाने थाटली हसेती. या मार्गावर एडेड शाळा, नगरपरिषद शाळा, स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती
बॅंक व पुढे नातुवाडी निवासी परीसर आहे. या मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. अतिक्रमणांमुळे रस्त्याने जाणाऱ्यांना अक्षरशः ह्या रस्त्याने
जीव मुठीत धरुन चालावे लागत असे. शाळकरी मुले व महिला, वृद्धांना त्रास सहन करावा लागत होता. काही टवाळखोर युवक मुलींची छेडखानी करण्याचा
प्रयत्न करतात अशा तक्रारी होत्या. शाळा परीसरात गुटखा विक्री बंधनकारक
असतांना देखील अगदी शाळेजवळ गुटखा विक्री होत होती. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत जनतेची
मागणी होती. आज रोजी अतिक्रमणे हटविण्यात आले. त्यामुळे जनतेकडून
संतोष व्यक्त करण्यात येत आहे. सदर ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार
नाही यासाठी नगरपरीषदेने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी देखील
जनतेकडून करण्यात येत आहे.
0 Comments