'महिमा'च्या न्यायासाठी शिवसेनेचा पुढाकार !
याचिकेसाठी नागरीकांचा प्रतिसाद !
यवतमाळ : स्कुल बस अपघातात मृत्यू पावलेल्या ' महिमा ' हिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने ( शिंदे गट ) पुढाकार घेतला आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आज कार्यकर्त्यानी उमरखेड शहरात फिरुन ' एक हात मदतीचा, एक रुपया ' हि संकल्पना राबविली. या उपक्रमाला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .
दहागाव येथील स्टुडन्टस वेल्फेअर इंग्लीश मेडियम स्कुलच्या बेजबाबदार प्रशासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. महिमाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कडक कार्यवाही करा, तसेच आरोपी संस्था चालकास अटक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस प्रशासना विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. महिमाला न्याय मिळावा यासाठी शिवसेना प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शहर शिवसेना पुढाकार घेऊन शहरातील व्यापारी तथा नागरीकां कडून एक हात मदतीचा म्हणून एक एक रुपया जमा करत आहे. सर्व स्तरातील नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शहर प्रमुख अँड. संजय जाधव, कैलास कदम, रवि रुडे, राजु गायकवाड, सपना चौधरी, दामोधर इंगोले, बसवेश्वर क्षीरसागर व मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
0 Comments