सिएसच्या पथकाची रुग्णालयावर धाड : नियमबाह्य सुरु होते रुग्णालय ; पोलीस ठाण्यात तक्रार

यवतमाळ : रुग्णालय चालविण्यासाठी आवश्‍यक असलेली परवानगी न घेता सुरु असलेल्या रुग्णालयावर सिएसच्या पथकाने धाड टाकली. त्या ठिकाणी नियमबाह्य औषधी व साहित्य आढळले आहे. त्यामुळे सिएसच्या पथकाने पोलीस ठाणे गाठून महिला डॉक्टरच्या विरोधात तक्रार दिली. ही कारवाई आज सोमवारी दुपारी करण्यात आली.

नेर येथील ताज नर्सिंग होम नियमबाह्य सुरु असल्याची गोपनीय तक्रार सि एस ऑफीसमध्ये प्राप्त झाली होती. त्यावरुन खुद्द सि.एस. सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी रमेश मांडणकर व त्यांच्या समितीने आज सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी धाड टाकुन चौकशी सुरु केली. यावेळी ताज नर्सिंग होमकडे रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणारे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. बायो मेडिकल वेस्ट प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचा परवाना आढळला नाही.

नियमबाह्य औषधी आढळली

सिएस समितीने या रुग्णालयाची चौकशी केली असता या प्रसुती गृहामध्ये नियमबाह्य औषधी व साहित्य सापडले आहे. त्यामुळे सिएसच्या समितीने रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई केली आहे.

नेर पोलीस ठाण्यात तक्रार

या प्रकरणी ताज नर्सिंग होमच्या संचालिका डॉ. शबीना मिर्झा यांच्या विरोधात जिल्हा शल्य चिकित्सक समितीने नेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या कारवाईने नियमबाह्य रुग्णालय चालविणा-या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments