प्रशांत कोरटकरांवर गुन्हे नोंद करा : मराठा महासंघाची मागणी

 इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी : आंदोलन करण्याचा इशारा

यवतमाळ : प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीकडून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अश्लील भाषेचा वापर करत धमकीचा फोन केला. सदर कॉल मध्ये प्रशांत कोरटकर नामक व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बद्दल बोलतांना मर्यादा ओलांडल्या. त्यातच जेम्स लेनच पुन्हा एकदा उदात्तीकरण करण्यात आले. प्रशांत कोरटकर या मनुवादी विचाराच्या व्यक्तीने महापुरुषाप्रती गरळ ओकण्याचे काम केले, या विषयी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अश्लील भाषेचा वापर करीत धमकी फोन केला. शिवरायांना, संभाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न नेहमीच मनुवादी लोकांकडून झालेला आहे. शिवराय, संभाजीराजेवर गरळ ओकत आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशारा मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी दिला. प्रशांत कोरडकर नामक व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी महागाव तालुका मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच महागाव पत्रकार संघटना आणि सकल मराठा बहुजन समाज महागावचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीवर तातडीने गुन्हे नोंद करा अन्यथा येत्या आठ दिवसांत राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments