पाटापांगरा येथील प्रणय कांबळे बनला अन्न सुरक्षा अधिकारी : गावक-यांनी केले स्वागत
यवतमाळ : जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रणय दामोधर कांबळे या विद्यार्थ्याने एमपीएससी परिक्षेत बाजी मारली आहे. त्याची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथील रहिवासी आहे. त्याच्या प्रथम आगमन प्रसंगी जिप्सीवर मिरवणूक काढून, फटाके फोडून व बँडच्या गजरात गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.
प्रणय कांबळे याचे प्राथमिक शिक्षक पाटापांगरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर त्याने वर्ग 6 ते 12 वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथे शिक्षण घेतले. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्याने बीएससी अग्री पूर्ण केली. इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण एम एस सी ऍग्री महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहील्यानगर येथे पार पाडले. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा तो करत होता. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारी बनला. त्यामुळे त्याचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा प्रकाश गायकवाड (अध्यक्ष पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ पडसा) ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून किशोर मुनेश्वर (माजी सहा. पोलीस निरीक्षक यवतमाळ), सुभाष भवरे, विनोद शेंडे, मारोतराव कांबळे, निवूत्ती वंजारे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू गुल्हाने, ग्रामपंचायत सदस्य अमोल डेहनकर, राजकुमार होळकर, विजय पेटकुले, बुद्धप्रिय भवरे, संजय ठाकरे, शिवशंकर होळकर, अमोल खोब्रागडे, संतोष होळकर, रविकांत वांढरे, सिध्दार्थ मानकर, जयभिम जोतिबा कांबळे, लखु पेटकुले, राजू लेंडे, अतुल डेहनकर, विलास ननपट्टे, कोमल खोब्रागडे, संदीप गुल्हाने, दिलीप कोवे, शंकर कांबळे, सचिन कांबळे, रोशन लोखंडे, सत्यशील भवरे, प्रशिक कांबळे, मनोज भवरे, गोलू मानकर, सदानंद लढे, दीपक कांबळे, बुद्धलिन भवरे, विनोद कांबळे, चरण भगत आधी उपस्थित होते.
अन् प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा झाली
प्रथम आगमना प्रसंगी पाटा पांगरा येथे त्याच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देतांना, पदवी घेत असताना मला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर यासाठी प्रयत्न केले. अन् आता अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाली आहे. या यशाचे माझे आई वडील, आजी व प्राथमिक शाळा, नवोदय, कृषी महाविद्यालय, पदव्युत्तर महविद्यालय येथील शिक्षकवृंद यांना दिले.
‘तो’यशस्वी झाला
मी ज्या चुका केल्या त्या चुका न करता मुलाने उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे आणि त्यात तो यशस्वी झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आता त्याने समाजहितासाठी काम करावे हीच इच्छा मनी बाळगतो. अशी प्रतिक्रिया त्याचे वडील दामोधर कांबळे यांनी दिली.
0 Comments