शक्तिपीठ महामार्ग : घाटंजीतून वगळल्याने नागरिकात नाराजी

महेंद्र देवतळे / तहलका टाइम ऑनलाईन

घाटंजी (यवतमाळ) : नागपूर ते गोवा हा जाणारा शक्तिपीठ महामार्ग धार्मिक स्थळांना जोडून जाणार होता. त्यात घाटंजी तालुक्यातील अंजी नृसिंह येथे भगवान नृशीहाचे पुरातन मंदिर असून येथून हा मार्ग प्रस्थावीत होता. त्या संदर्भात ड्रोन कॅमेरा द्वारे सदर मार्गाचा सर्वे सुद्धा झाला होता. मात्र अचानक घाटंजी वरून जाणारा मार्ग घाटंजी पर्यत येऊच दिला नाही. मधातूनच तो वडगाव कारेगावकडे वळवण्यात येणार असल्याची माहिती असून, घाटंजीचे कायमचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा रूट बदलल्यामुळे तालुक्यातील नागरिकात नाराजी पसरली आहे.

राळेगाव ते घाटंजी होता प्रस्तावित

दोन्ही तालुके आदिवासीबहुल असल्यामुळे वयात तालुक्याचा पाहिजे तसा विकास न झाल्यामुळे सदर शक्तीपीठ महामार्ग या तालुक्यातून गेला असता तर भविष्यात रोजगाराच्या व इतर संधी उपलब्ध झाल्या असत्या. मात्र हा मार्ग वळवण्यात आल्यामुळे सदर दोन्ही तालुके आता विकासापासून कोसो दूर राहणार आहे.

दोन आमदाराकडून अपेक्षा

 नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग हा राळेगाव घाटंजी तालुक्यातून जाणार असल्यामुळे या तालुक्यातील जनतेत उत्साहाचे  वातावरण होते. मात्र हा महामार्ग आता या तालुक्यातून जाणार नसल्याने लोकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. राळेगावचे कॅबिनेट मंत्री नामदार अशोक उइके व वेळापूर आर्णीचे आ. प्रा. राजू तोडसाम हे दोघेही भाजपाचे आमदार असल्यामुळे आता जनता त्यांच्याकडून हा महामार्ग तालुक्यातून जाण्यासाठी आशा व्यक्त करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मार्ग पूर्वीप्रमाणे राळेगाव व घाटंजी वरून न्यावा अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.


Post a Comment

0 Comments