राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप : तीन खेळाडूंना सुवर्णपदक !



यवतमाळ : नुकत्याच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रीय स्तरावर, ६८ राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप घेण्यात आली. महाराष्ट्राच्या संघात यवतमाळ येथील तीन खेळाडू सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे.

रत्नशील विनोद डोंगरे, सम्यक सुरेंद्र गजभिये, रोहांशू प्रवीण खंडारे अशी सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंची नावे आहे. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे वतीने आयोजित महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा (१९ वर्षे आतील) चे आयोजन केले होते. यामध्ये २० राज्यांच्या चमूने सहभाग घेतला होता. या स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासूनच अगदी अंतिम सामन्याच्या लढतीपर्यंत महाराष्ट्राचा संघ अत्यंत प्रबळ कामगिरी करत होता. उपांत्य फेरी गाठत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीत सीबीएसई च्या संघाला ४:० अशा होमरनने नमवून सर्वोच्च स्थान पटकाविले व चषक आपल्या नावाने केला. या सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघात यवतमाळ येथील रत्नशील विनोद डोंगरे, सम्यक सुरेंद्र गजभिये, रोहांशू प्रवीण खंडारे हे तीनही खेळाडू चमकले आहे. सदर खेळाडू अमलोकचंद महाविद्यालयातील आहे.

या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शारीरिक शिक्षक पियुष चांदेकर, पंकज शेलोटकर, भाकीत मेश्राम, निशांत सायरे यांना दिले. अमलोकचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विजय बाबू दर्डा, संस्थेचे सचिव प्रकाश चोपडा, प्रतिष्ठित संचालक मंडळ, प्राचार्य आर. एम. मिश्रा, उप प्राचार्य व्ही. सी. जाधव, शारीरिक शिक्षक संचालक प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक संजय पंदिरवाड (मा. सैनिक), समस्त प्राध्यापकवृंद, यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, प्रा. विकास टोणे, नरेंद्र फुसे, नरेंद्र तरोणे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे, क्रीडा अधिकारी सचिन हरणे, सॉफ्टबॉल क्रीडाप्रेमींनी त्यांचे कौतुक केले. तीन्ही खेळाडूंचे पाटिपुरा वस्तीत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments