यवतमाळ : ऑनलाइन जॉब लावुन देण्याचे
आमिष दाखवून एका युवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. यश शरद राजुरकर वय २०
वर्ष रा. रामदेव बाबा रेसीडेंडी रामराज्य चौक पिंपळगाव यवतमाळ असे फसवणूक झालेल्या
युवकाचे नाव आहे. ६ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या दरम्यान 9163279393 क्रमांकाच्या
मोबाईलवरुन फोन आला. ऑनलाईन जॉब लावुन देण्याचे आमिष दाखविले. त्यापोठी १० हजार
रुपये घेतले असून, अजुनही जॉब लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी यश राजुरकर याने यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार
दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु
आहे.
0 Comments