शहरातील दोन गुन्हे उघड : डी. बी. पथकाची कारवाई : तेलंगणा पोलिसांच्या दिले ताब्यात
शेख
मोबीन शेख ईसराईल वय २७ वर्ष रा. बेंडकीपुरा,
यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. दि. १७
फेब्रुवारी रोजी आरोपी शेख मोबीन हा शहरातील श्याम टॉकीज परिसरात हुडी
पांघरुन फिरत असल्याची माहीती यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे
प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यशावरुन पथ काने सापळा रचुन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांने मेन
लाईल मधील अहुजा फोटो स्टुडीओचे दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या रोख रक्कम पैकी २९,५००
रुपये पोलीसांनी जप्त केले. तसेच पोलीस कोठडी दरम्याण चौकशी केली असता त्यांने
फेब्रुवारी २०२० मध्ये सुध्दा शहरातील सुरेश नगर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.
तयाच्याकडून सोन्याचे कानातील किमती ९०,००० रुपयाचे टॉप्स त्याचे घरातुन जप्त करण्यात आले. दोन
गुन्ह्यातील एकुण १,१९,५०० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
चार राज्यात चोरी : २०२० पासून ‘वॉन्टेड’
यवतमाळ शहर
पोलिसांनी सराई गुन्हेगाराला ताब्यात घेतल्याची माहीती हैद्राबाद पोलीसांना
मिळाली होती. सन २०२० पासुन त्यांना पाहीजे असलेला शेख मोबीन
याला ताब्यात घेण्यासाठी तेलंगना पोलीस सुध्दा यवतमाळ शहरात दाखल झाले होते. शेख मोबीन
हा महाराष्ट्र राज्यासह राजस्थान,
मध्य प्रदेश, तेलंगाना, हैद्राबाद वगैर राज्यात चोरी करणारा सराईत गुन्हेगार असुन तो २०२० पासुन
यवतमाळ जिल्याचे वेगवेगळे पोलीस ठाण्यांना सुध्दा पाहीजे होता.
कारवाई करणारे पथक
सदरील
गुन्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता,
अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,
उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि विकास दांडे, पोह रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, पोना
मिलींद दरेकर, पो अं. गौरव
ठाकरे, अभिषेक वानखेडे, पवन नांदेकर यांनी केली.
0 Comments