अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे : एक कामगार ठार

 चालकासह कामगार जखमी : देवधरी घाटाजवळील घटना

यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून विटा घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की ट्रॅक्टर व ट्रॉलीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. यामध्ये ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला बसलेला कामगार जागीच ठार झाला. तर चालकासह अन्य कामगार जखमी झाले. ही घटना वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवधरी घाटाजवळ दि ४ फेब्रुवारी रोजी सायंकाच्या सुमारास घडली.
दिनेश गोपाळराव सोयाम वय २४, रा. एकुर्ली असे मृतकाचे नाव आहे. तर चालक अभय गजानन कुटे, सुरेश वसंतराव बलांद्रे असे जखमीचे नाव आहे. राळेगाव तालुक्यातील एकुर्ली येथील सारंग शिरपुरे यांच्या मालकीच्या एमएच २९ सीबी ३०८६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये पांढरकवडा तालुक्यातील श्रीराम ट्रोन थ्रेशर कोंगारा येथून सिमेंट विटा घेऊन येत होते. अशातच देवधरी घाटाजवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात कामगार दिनेश जागीच ठार झाला. तर चालक व एक कामगार जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे, पी एस आय प्रशांत जाधव, कर्मचारी निलेश वाढई यांनी घटनास्थळ गाठले.  पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवाला.

Post a Comment

0 Comments