दोन आरोपींना अटक : मुख्य आरोपी फरार : जिल्ह्यातील दोन गुन्हाच्या छडा
यवतमाळ : जेष्ठ नागरीकांसह एटीएम कार्ड वापरण्याचे ज्ञान नसलेल्या इसमावर वॉच ठेवून त्यांचे जवळुन हात चालाखीने एटीएम कार्ड अदलाबदल करुन बँके खात्यामधुन पैसे काढणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सदर टोळीचे आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात नेटवर्क असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपीकडून सव्वा सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मुख्य सुत्रधार फरार असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहे.
मोहन्ना व्यंकटरमण चिंताला, वय ३० वर्ष, रा. राजीव नगर
कॉलनी पिलेरु जि अनामया आंध्रप्रदेश, कृष्ण मल्लप्पा भिमनळीकर, वय ३० वर्ष, रा. रतनपुर ता
चिंतापुर जि गुलबर्ग आंध्रप्रदेश ह.मु. रेड्डी लेआउट बैंग्लोर कर्नाटक अशी अटक
केलेल्या आरोपींची नावे आहे. तर एस. कृष्णमुर्ती, रा. कोकंणती क्रॉस बाला समुद्रम जि अंतपुर ह.मु. पदमावती नगर तिरुपती
आंध्रप्रदेश असे फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.
अन् दुसरे एटीएम कार्ड देवून काढले पैसे
दारव्हा तालुक्यातील हरु येथील तुळशीदास भानुदास गावंडे हे २५ जानेवारी रोजी त्याचे
खात्यामधुन पैसे काढणे करीता दारव्हा येथील एसबीआय बँकचे एटीएममध्ये गेले
होते. ए.टी.एम मधुन पैसे काढत असतांना त्याचे ए.टी.एम कार्ड एक दोन वेळा
प्रयत्न करुन सुध्दा काम करत नव्हते. यावेळी त्याच्या जवळ उभा
असलेला अनोळखी ईसम हा पाहत होता. त्यावेळी त्याने ए.टी.एम मधुन पैसे काढण्याची प्रक्रिया
सांगीतली. कोणत्याही प्रकारे ए.टी.एम कार्ड साथ देत नसल्याने
त्याने ए.टी.एम कार्डची हेरा फेरी करुन फिर्यादीस दुसरे ए.टी.एम कार्ड परत दिले. त्यानंतर
फिर्यादीच्या बॅक खात्यामधुन अज्ञात इसमाने विविध ठिकाणावरुन
१ लाख १५ हजार रुपये विड्रॉल केल्याचे लक्षात आले.
दारव्हा व अवधूतवाडीत गुन्हा दाखल
तुळशीदास भानुदास गावंडे रा. हरु
यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन दारव्हा येथे अप क्रमांक ५९/२०२५
कलम ३१८ (४) भा.न्या. 1. सं.
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी
असाच गुन्हा करण्याचे पध्दतीचा पोलीस स्टेशन अवधुतवाडी अप क्रमांक
११०/२०२५ कलम ३१८(४) भा.न्या. सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
आंध्रप्रदेश व कर्नाटकात आरोपीचा शोध
यवतमाळ
जिल्ह्यातील दारव्हा व अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे घडले
होते. पोलीस अधीक्षककुमार चिंता यांनी सदर गुन्हे
उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा
व अधिनस्त पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिल्या होत्या. त्यावरुन पथक आरोपीच्या शोधासाठी आंध्रप्रदेश व कर्नाटक
येथे गेले होते. त्यानंतर संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी
एस. कृष्णमुर्ती,
रा. कोकंणती क्रॉस बाला समुद्रम जि अंतपुर ह.मु. पदमावती नगर तिरुपती
आंध्रप्रदेश याने के.ए.३२ डी ५८८१ या वाहनाने त्याचे साथीदारासह महाराष्ट्र व इतर राज्यात
जाउन लोकांकडुन ए.टी.एम कार्ड बदलवून पैसे काढुन फसवणुकीचे
गुन्हे केल्याची माहिती समोर आली.
दोन गुन्ह्याची कबुली, मुद्देमाल जप्त
त्यावरुन पथकाने एस. कृष्णमुर्ती
याचे दोन्ही गुन्हयातील साथीदार मोहन्ना व्यंकटरमण चिंताला, वय ३० वर्ष, रा. राजीव नगर
कॉलनी पिलेरु जि अनामया आंध्रप्रदेश, कृष्ण मल्लप्पा भिमनळीकर, वय ३० वर्ष, रा. रतनपुर ता
चिंतापुर जि गुलबर्ग आंध्रप्रदेश ह.मु. रेड्डी लेआउट बैंग्लोर कर्नाटक यांना तपासात
हजर येण्याबाबत समज दिला. त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता एस. कृष्णमुती
याचे सोबत त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांचा
साथीदार एस. कृष्णमुर्ती हा पसार असल्याचे सांगीतले. पोलिसांनी दोन्ही आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील फसवणुकीची रक्कम १ लाख २० हजार रुपये व गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक के. ए.
३२ डी ५८८१ किंमत ५ लाख रु व मोबाईल किंमत ५ हजार असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
केला.
आरोपी दारव्हा पोलिसांच्या ताब्यात
पो.स्टे. दारव्हा व पो.स्टे. अवधुतवाडी
येथील दाखल दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. तसेच आरोपीने नागपुर व इतर
ठिकाणचे सुध्दा गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. वरुन दोन्ही आरोपी यांना तपासकामी पोलीस
स्टेशन दारव्हा यांचे ताब्यात
दिले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन दारव्हा येथील अधिकारी करीत
आहे. इतर जिल्हयामधील अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता
आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असुन यांचेवर इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारचे १० ते १२
गुन्हे नोंद आहेत.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप, पोलीस
निरीक्षक, सतिष चवरे स्थानिक
गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या
मार्गदर्शनात सपोनि विजय महाले, पोलीस
अंमलदार बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन
जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी व अमित कुमरे,
सर्व स्थानिक गुन्हे शाखा,
यवतमाळ व प्रणय इटकर,
प्रगती कांबळे, रोशनी
जोगडेकर सायबर सेल यवतमाळ यांनी केली.
0 Comments