काँग्रेसने कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचा घाणाघात

यवतमाळ : काँग्रेसने कुठल्याही कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. पैशासाठी सत्ता हे धोरण अवलंबून काँग्रेस नेत्यांनी अप्पलपोटेपणा केला. 70 वर्षात देशाला दारिद्र्याच्या खाईत लोटले गोरगरिबांची दशा केली असा घाणाघात करत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर तोफ डागली.

उमरखेड येथे भाजपाच्या वतीने आयोजीत पक्ष प्रवेशा दरम्यान ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील दहा वर्षाच्या काळात भाजपा सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांसाठी मोफत धान्य, एका रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज, अशा विविध योजना राबवून विकासाचा संकल्प केला. पुढील पाच वर्षात पांदण रस्ते वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करणे, गोरगरिबांना वीस लाख घरकुलांचे वाटप अशा कल्याणकारी योजना राबवल्या. काँग्रेसने आजवर खोटे बोलून सत्ता उपभोगली लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरविली. परंतु जोपर्यंत भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही ठासून सांगितले.

सव्वा कोटी सदस्य नोंदणी

भाजपाने राज्यामध्ये एक कोटी 25 लाख विक्रमी सदस्य नोंदणी केली आहे. यापुढे तीन लाख सक्रिय सदस्य करणार असा विश्वास ना. बावनकुडे यांनी व्यक्त केला. लोकांचा मोदी व फडणवीस यांच्या विकास संकल्पाकडे ओढा वाढल्याने जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

यांनी केला भाजपात प्रवेश

यावेळी पक्षांमध्ये प्रवेश घेतलेले माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, रमेश चव्हाण, यांनी काँग्रेस पक्षाने कशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक दिली याचा पाढा वाचला. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश दुधेवार आणि महेश काळेश्वरकर यांनी केले. तर आभार प्रा विजय गुजरे यांनी मानले.

 

 


Post a Comment

0 Comments