अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीस शिक्षा

यवतमाळ : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपींस ३ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या. हेमंत सातभाई यांनी हा निकाल दिला.

राहुल बंडुजी नंदुरकर रा. मारेगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. २.जुलै २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजातच्या दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी ही घरी कोणीही हजर नसतांना एकटीच झोपुन होती. आरोपी राहुल नंदुरकर हा वाईट उददेशाने घरात घुसला. सदर मुलीचा विनयभंग केला. पो. स्टे. मारेगाव येथे जबाणी रिपोर्ट दिल्यावरुन अपराध क. १८१/२०१८ अन्वये भांदविचे कलम ४५२,३५४,३५४- ए व सहकलम बाललैंगिक अत्याचार पासुन बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदयाअंतर्गत गुन्हयाची नोंद केला होता. तत्कालीन पोलीस उपविभागिय अधिकारी विजय लगारे, यांनी गुन्हयाचा सखोल तपास करुन वि. विशेष अति. सत्र न्यायालय पांढरकवडा येथे दोषारोप पत्र दाखल केले. अभीयोग पक्षातर्फे सदरहु खटल्यात अॅड. रमेश. डी. मोरे सहा. अभियोक्ता केळापुर यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची आई, यांची साक्ष महत्वाची ठरली. अभियोग पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे व युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी राहुल बंडुजी नंदुरकर, यास भादंविचे कलम ४५२ मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व कलम ३५४ मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व दोन्ही गुन्हयामध्ये प्रत्येकी १००० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिण्याचा अतिरीक्त साधा कारावास तसेच बाललैंगिक अत्याचार पासुन बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व १५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिणे अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सदर सर्व शिक्षा एकत्रपणे भोगण्यासंबधी तसेच दंडाच्या रकमेमधुन पिडीतेला रुपये ३०००/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित करण्यात आला. अभीयोग पक्षातर्फे रमेश डी. मोरे सहा. सरकारी अभियोक्ता केळापुर यांनी खटला चालविला. पैरवि अधिकारी म्हणुन सहा. पो. उप. नि दिपक गावंडे पो. स्टे. मारेगाव यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments