अन् ‘त्या’ विद्यार्थीनीच्या काकूने फोडला हंबरडा

पालकांसह महिलांनी केला चक्का जाम : सर्व संचालकाना अटक करा

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी येथील विद्यार्थीनी कु महीमा सरकाटे या मुलीचा स्कुल बस अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संस्था अध्यक्ष व संचालकांना अटक करा या मागणीसाठी आज शनिवारी पळशी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मृतक महिमाच्या काकुने रस्त्यावर हंबडा फोडून डोळ्यातून अश्रुना वाट मोकळी केली. यावेळी सर्वांच्या भावना दुःखावल्या होत्या. कु महीमा ची काकु  बोलत होती नवस करून तेरा वर्षानी महीमा आमच्या घरात जन्माला आली. संस्थेच्या संचालकांनी महिमांचा बळी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

पालकांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संस्थेच्या अध्यक्षांसह संचालकांना पालक सभेमध्ये सूचना देऊनही कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे हा भीषण अपघात झाला असून, संस्था संचालक जबाबदार आहे असा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पळशी फाटा येथे आज दि १ फेबुरवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आंदोलन केले. त्यामुळे पळशी फाटा येथे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. उमरखेड - पूसद राज्य मार्ग रस्ता दोन तास चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनात महिला, पुरुष, ग्रामस्थ, शिवसेना (शिंन्दे) गटाचे सैनिक चिंतागराव कदम, सविता कदम,ॲड संजय जाधव, कैलास कदम, रवि रुडे, राजू गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.

आरोपींना अटक करु

सदर टना अंत्यंत दुदैवी असून, पोलीस प्रशासन मृतक मुलीच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कायद्यानुसार आरोपीस अटक करू, पोलिसांना वेळ दयावा. आरोपीचा शोध घेत असल्याची प्रतिक्रीया हनुमंत गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिली.


Post a Comment

0 Comments