अल्पवयीन चोरट्यास अटक : ३० ग्रॅम सोने जप्त



यवतमाळ : शहरातील बांगर नगरातील घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या डि.बी पथकाने अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणुन ३० ग्रॅम सोने जप्त केले.

सुजर हिरासींग बैस वय ३९ वर्ष रा. बांगरनगर यवतमाळ हे दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे वडीलांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना पाहण्यासाठी पिंपरी बुटी या ठिकाणी गेले होते. दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी ते परत घरी आले. यावेळी घराचे दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसलेआलमारीतून पत्नीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेल्याचे समोर आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीचे विरोधात गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. शहर डि.बि पथकाने या एका अल्पवयीन मुलांस ताब्यात घेवू चौकशी केली. त्यांनेच त्याचे साथिदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेले २९.६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक रोहीत ओव्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि विकास दांडे, सपोनि संजय आत्राम, पोह रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, पोना मिलींद दरेकर, पोअं प्रदिप कुराडकर, गौरव ठाकरे, अभिषेक वानखेडे, अश्विन पवार यांनी केला.

Post a Comment

0 Comments