कारच्या धडकेत इसम ठार ; महागाव तालुक्यातील गुंज येथील घटना

मंचक गोरे / तहलका टाईम न्युज नेटवर्क

महागाव (यवतमाळ) : माहूर कडून पुसद कडे सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने इसम जागीच  ठार झाला. ही घटना आज ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गुंज येथील पेट्रोल पंपाजवळ घडली.

भिमराव राघोजी कांबळे वय ६५ रा. गुंज असे मृतकाचे नाव आहे. मृतक भीमराव हे सायंकाळी सहाच्या दरम्यान पेट्रोल पंपा कडून रस्त्याच्या कडेने बस स्टॅन्डकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या पांढऱ्या कलरच्या कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे जमादार गजानन ऐडतकर करत आहे. भिमराव कांबळे हे पाळीव गाय, जनावराचा चारापाणी करत होते. त्यावर त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होते.


Post a Comment

0 Comments