रानडुक्कराची दुचाकीला धडक : महिला ठार


यवतमाळ : शेतातून घराकडे परत येत असताना रानडुकराने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात महिला ठार झाली. तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  ही घटना आज 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नेर तालुक्यातील पिंपरी ईजारा येथे घडली. 

लता दिपक ठाकरे वय 45 वर्ष रा. नेर असे मृतक महिलेचे नाव आहे. तर दिपक ठाकरे रा. नेर असे जखमीचे नाव आहे. ठाकरे दाम्पत्य आज रविवारी पिंपरी इजारा परिसरातील शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून एम एच 29 बी डब्ल्यू 97 87 क्रमांकाच्या दुचाकीने ते नेर कडे परत येत होते. दरम्यान रानडुक्कराने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून खाली पडल्याने ठाकरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान लता ठाकरे यांचा मृत्यू झाला. तर जखमी दिपक ठाकरे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments