युवा प्रशिक्षणार्थ्यांना लागणार ‘ब्रेक’

पुन्हा सुशिक्षीत बेरोजगार होणार : जिल्हाकचेरीवर धडक

यवतमाळ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी दिली होती. युवा प्रशिक्षणार्थ्यांना विविध विभागात नियुक्ती देण्यात आली होती. सहा महिने सेवा दिल्यानंतर फेब्रुवारी मध्ये त्याचा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थ्याना आता ‘ब्रेक’ लागणार असून, त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे.

प्रशिक्षणार्थ्यांची जिल्हाकचेरीवर धडक

शासकीय कार्यालयात सेवा दिल्यानंतर आता युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या सेवेचा कालावधी संपल्यानंतर ते बेरोजगार होणार आहे. त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास सवलत, शेतकरी आत्मसन्मान व इतर लाभाच्या योजना सुरू केल्या आहे. त्या योजनासाठी कोणताही कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनाची सहा महिन्यांची रद्द करावी. प्रशिक्षणार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने ११ महिने करिता नियमित रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली.  

सरकारने मागण्या मंजूर कराव्या

कंत्राटी मानधन तत्वावर कायमस्वरूपी करण्याबाबत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कार्यकाल वाढविणे, प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाल एक वर्ष (११ महिने) वाढविण्यात यावा, ज्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थीना रूजु करण्यात आले होते. त्याच आस्थापनेवर परत रोजगार देण्यात यावा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या मागण्या सरकारने मंजूर कराव्या. बेरोजगार होणाऱ्या युवकांना नवीन सुरवात व भविष्याची दिशा निश्चित करावी. सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना सहकार्य करावे व मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी मागणीही अध्यक्ष पंकज चव्हाण, उपाध्यक्ष आकाश राठोड, सचिव राकेश चिंचोलकर यांनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments