दोन माजी आमदारांच्या ‘हाता’त फुलले ‘कमळ’

 उमरखेड येथे पार पडला भाजपाचा पक्ष प्रवेश सोहळा

यवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमरखेड येथे आज २२ फेब्रुवारी रोजी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांच्यासह माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष बालाजी उदावंत, भावना उदावंत, कृष्णा पाटील देवसरकर, राजीव मोतेवार, बाळासाहेब भट्टड, महागाव तालुक्यातील साहेबराव कदम हिवरेकर, जगदिश नरवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या पक्ष प्रवेशाने काँग्रेसच्या दोन माजी आमदाराच्या हातात कमळ फुलल्याचे दिसून येते. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments