विद्यार्थी नेणा-या दोन ऑटोचा अपघात : एक विद्यार्थी ठार

पालकांनी व्यक्त केला संताप : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

यवतमाळ : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थी घेवून जाणा-या दोन ऑटोचा अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला. ही दुदैवी घटना आज ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुसद शहरातील साई मंदिर परिसरात घडली. या घटनेने पालकांत संतापाची लाट पसरली आहे. उमरखेड तालुक्यातही स्कुल बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात महिमा नामक विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच ऑटोचा अपघात होवून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ही दुसरी घटना आहे.

सौरव भिका राठोड रा. दहिवड ब्रु. ता. पुसद असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुसद येथील आसेगावकर शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. दहिवड येथे स्कुलबस जात नसल्याने त्या गावातील विद्यार्थी ऑटोने पुसद येथे शाळेत येतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी सौरव व अन्य विद्यार्थी ऑटोने शाळेत जात होते. अशातच पुसद येथील साईमंदिर परिसरात एम. एच. २९ व्हि. ८९७६ क्रमांकाचा ऑटो व दुस-या ऑटोचा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये सौरव राठोड हा विद्यार्थी ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. उमरखेड व पुसद येथे झालेल्या अपघाताच्या घटनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

 

Post a Comment

0 Comments