‘त्या’ निर्णयाला मनविसेचा विरोध

फौजदारीच्या निर्णयाला स्थगिती द्या ; नविसेचे जिल्हाधिका-या मार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन 

यवतमाळ : दहावी, बारावीच्या परिक्षा सुरु होत आहे. परिक्षा केंद्रावर जे विद्यार्थ्यां कॉपी करतांना आढळून येतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहे. या आदेशाला महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विरोध दर्शविला आहे. आम्ही कॉपी करण्यांचे समर्थन करत नाही. मात्र शालेय दशेत कोणाकडुन कळत नकळत चुक घडल्यास त्याचेवर फौजदारी कारवाई करु नये अशी मागणी मनविसेने केली आहे. 
शासनाने कॉपी करण्या-या विदयार्थ्यांवर फौजदारी करण्याचा आदेश हा त्वरीत रद्द करण्यात यावा या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री दादा दगडूजी भुसे यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसे शहरध्यक्ष अमित बदनोरे, प्रथमेश पाटील, तुषार काटपेलवार, साईराम कवडे, साहिल जतकर, अभिषेक तरेकर, भरत राठोड, रोशन गवई, वासुदेवराव विधाते, विजय राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments