कोंबड खाण्यासाठी जाणे जिवावर बेतले

 एस टी – दुचाकीचा अपघात : दुचाकीस्वार ठार

यवतमाळ : किनवट आगाराची बस प्रवासी घेवून शिरोली कडून दहेगावकडे जात होती. अशातच बस व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, काही प्रवासी जखमी झाले आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घाटंजी तालुक्यातील दहेगाव शिवारात घडली. साळभावाकडे कोंबड खाण्यासाठी जाणे दुचाकीस्वाराच्या जिवावर बेतले आहे.

चंदु चव्हाण रा जळका ता. राळेगाव असे मृतकाचे नाव आहे. घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे साळभावाकडे तो कोंबड खाण्यासाठी जात होता. सुभाष सायन्ना कनकावार वय 52 वर्ष असे फिर्यादीचे नाव असून, ते किनवट बस डेपोमध्ये चालक या पदावर कार्यरत आहे. आज ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चालक सुभाष कनकावार व वाहक निलेश कोरडे यांची यवतमाळ मार्ग मांडवी, पाटापांगरा घाटंजी या बस क्रमांक MH20-BL1981 वर ड्युटी लागली होती. सकाळी ८ वाजता दरम्यान किनवट वरून यवतमाळकडे जाण्याकरीता मांडवी, पाटापांगरा, घाटंजी मार्ग ते निघाले होते. अशातच सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सदर बस शिरोली या गावाकडुन दहेगावकडे येत होती. दरम्यान दहेगावकडून येणा-या चंदु चव्हाण याने आपल्या ताब्यातील MH 40 BP-7804 क्रमांकाच्या दुचाकीने बसला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली उतरली. या अपघातात प्रेमिला अरुण राठोड जखमी झाली असून, अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्याच्यावर घाटंजी येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर चंदु चव्हाण रा. जळका ता. राळेगाव हा ठार झाला. बस चालक सुभाष कनकावार यांनी घाटंजी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली.

Post a Comment

0 Comments