प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात, बँक व्यवस्थापकाकडे तक्रार
यवतमाळ : मौल्यवान वस्तू सुरक्षित राहाव्या म्हणून अनेक जण सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतात. मात्र एका महिलेने लॉकरमध्ये ठेवलेले ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकरमधून सोने गायब झाल्याने महिलेने बॅके व्यवस्थापकासह पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकाराने बॅक खातेदारामध्ये खळबळ उडाली असून, आता बँकेतही सुरक्षा राहिली नसल्याचे दिसून येते.
हिराबाई नामदेव पिपरे वय ६८ रा. घाटंजी या महिलेचे एका बँकेत लॉकर आहे. सदर लॉकरमध्ये त्यांनी ३५० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. हिराबाई पिपरे यांनी शेवटच्यावेळी दिनांक २४ मे २०२४ रोजी लॉकर उघडले होते. त्यानंतर रितसर लॉकर कुलुप बंदही केले होते. त्यानंतर महिलेने पुन्हा दोन ते तीन वेळा बँकेत जावून लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र लॉकर उघडले नाही. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता, लॉक खराब असल्याचे सांगण्यात आले होते.
टेकनिशन समोर उघडले लॉकर
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बँक व्यवस्थापनाने हिराबाई पिपरे या महिलेला बॅकेत बोलावले होते. त्यामुळे सदर महिला घाटंजी येथील बँकेत गेल्या होत्या. यावेळी टेक्नीशन समोर लॅकर उघडण्यात आले. यावेळी दागिने लॉकरमध्ये नसल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. या प्रकाराने महिलेला धक्का बसला आहे.
दागिने चोरुन फसवणूक
हिराबाई पिपरे या महिलेने बँकेत रितसर लॉकर उघडले होते. त्यानंतर ३५० सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. दागिने चोरून फसवणूक करुन विश्वासघात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशा आशयाची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात दिली आहे.
चौकशी करुन कारवाई करु – ठाणेदार
फसवणुक झालेल्या महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजुनपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. या संदर्भात चौकशी करुन कारवाई करु अशी प्रतिक्रीया घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी दिली.
0 Comments