शॉर्ट सर्किटमुळे कापसाच्या गोडाऊनला आग

यवतमाळ : शॉर्ट सर्किटमुळे कापूस गोडाऊनला आग लागली. या आगीत ३५ क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, लाखो रुपयाचे नुकसान झाले.  ही घटना आज दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील काळी दौ. येथे घडली.

काळी दौलत येथील व्यापारी प्रकाश विठ्ठल मेथेकर यांची बसस्टँडवर ओम ट्रेडर्स दुकान आहे. या मध्ये ९० क्विंटल कापूस होता. सोमवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे कापसाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. नागरीकांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच या पुसद नगरपरिषदेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत गोडाऊन मधील ३५ क्विंटल कापूस जळुन खाक झाला. उर्वरित कापूस पाण्यात भिजल्यामुळे खराब झाला. या घटनेत २ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Post a Comment

0 Comments