शिवकालीन, ब्रिटीशकालीन तलावासह १ हजार तलावातील गाळ काढणार

 ना. संजय राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती : शिवजयंती पासून योजनेचा शुभारंभ

यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ३३ तलाव बांधले होते. सदर तलावात आजही मुबलक पाणी आहे. शेतकरी, सामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे, हा महाराजांचा तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. त्यामुळे शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचिन तलाव, गावतळे व पाणी पुरविण्यासाठी वापरण्यात येणारे सद्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहिम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत आहे.


राज्यस्तरीय शुभारंभ

आज शिवजयंतीच्या दिवशी या मोहिमेचा यवतमाळ जिल्ह्यातील किटा कापरा येथून राज्यस्तरीय शुभारंभ झाला आहे. राज्यातील शिवकालीन, बिटीशकालीन व गाव तलाव असे एकुण एक हजार तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री  तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

राज्यासाठी १०० कोटीचा बजेट

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने शिवजयंती पासून सुरु केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेतून राज्यात १ हजार तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. या योजनेसाठी सरकारने १०० कोटीचे बजेट मंजुर केले आहे.

शेतक-यांनाही १५ हजार रुपये देणार

ग्रामपंचायत स्तरावरही तलावातून गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्याचा फायदा शेतकर-यांना होणार आहे. तलावातून गाळ काढणा-यांना ३३ रुपये घनमिटर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच तलावापासून गाळ नेणा-या शेतक-यांना १५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर-यांची जमिन सुपिक होणार असून, त्याचे उत्पन्न वाढणार असल्याचेही पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.  

Post a Comment

0 Comments