ग्रामपंचायत
खडका यांनी ठराव घेत सोलार कंपनीला ही ई- क्लास जमीनच न देण्याचा ठराव घेतला होता.
या जमिनीवर बहुमूल्य किमतीचे सागवान,
सिताफळ, बोरी, लिंब, पळस, खैर, बाभळीच्या झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे.
सोलार कंपनीने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता आणि कुठलीही परवानगी न घेता प्रचंड
प्रमाणात वृक्षतोड केली आहे. शासनाची कसल्याही प्रकारची परवानगी
न घेता पुरावा नष्ट केला आहे. त्यापैकी काही झाडे आजही कापलेल्या ठिकाणीच जेसीबी मशीनने
बाजूला केलेली आहे. यापैकी काही झाडे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत
लावण्यात आली होती. त्याचे रेकॉर्ड
आजही संबंधित विभागाकडे उपलब्ध आहे. खडका येथील ई- क्लास ची सोलर कंपनीला दिलेल्या
जमिनीवरील बहुमूल्य वृक्षांची वृक्षतोड केली असल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. संबंधितावर
उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कार्यवाही करण्याची
मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनावर गजानन देशमुख, अरिफ शेख, प्रशांत देशमुख, अनिकेत देशमुख, प्रल्हाद
गोस्वामी, विलास वाघमारे, पांडुरंग गायकवाड, स्वप्निल
चौरे, विलास देशमुख, गजानन मने, प्रमोद कदम आदींच्या
स्वाक्षऱ्या आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments