यवतमाळ : लिफ्ट मागून काही अंतरावर
जावून चाकुचा धाव दाखवून इसमा जवळून सोन्याची अंगठी व दुचाकी घेवून चोरटा पसार
झाला. ही घटना दिनांक ८ फेब्रुवारी रोजी १२.३० वाजताच्या सुमारास उमरखेड बायपासवर घडली.
किशोर काशिनाथ वानखेडे वय ४२ रा.
उमरखेड असे फिर्यादीचे नाव आहे. तर शेख इब्राहीम शेख अल्लावल्ली वय ३२ रा. सुकळी
ता. उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. ८ फेब्रुवारी रोजी आरोपीने मला उमरखेड येथे जायचे
असल्याचे सांगुन फिर्यादीला लिफ्ट मागितली. मी गाडी चालवितो तु मागे बस असे म्हणून
मोटर सायकलने जात होते. अशातच गिट्टी क्रेशर बायपास रोडवर दुचाकी थांबविली. फिर्यादीस
चाकु दाखवुन त्याच्या जवळील सोन्याची अंगठी व एम.एच. २९ बी एन ९१७२ क्रमांकाची
दुचाकी जबरीने हिसकावून चोरून नेली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी आरोपी विरुद्ध
गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
0 Comments