यवतमाळ : शहरातील जाजु चौकातील भाजी व फळ विक्रेत्यांना त्या जागेवर हटवुन आठवडी बाजारात जागा दिली आहे. मात्र त्या ठिकाणी ग्राहक येत नसल्याने भाजीपाल्यांचे पैसे निघत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजी व फळ विक्रीसाठी जाजु चौकातच जागा द्या या मागणीसाठी वीर भगतसिंग फळबाजी विक्रेता संघाच्या वतीने नगर पालिकेसमोर धरणे व आमरण उपोषण केले होते. यावेळी मुख्याधिका-यांनी आंदोलकांसोबत चर्चा करुन हे आंदोलन संपुष्टात आणले होते. दुस-या दिवशी भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली होती. त्यानंतर आज पुन्हा दुकाने हटविण्यासाठी नगर पालिकेचे अधिकारी, पोलीस, बुलडोजर आदि फौजफाटा घेवून आले. यावेळी पोलीस व भाजी विक्रेते यांच्यासोबत हुज्जत झाली. तसेच एका वकीलासोबत ही पोलीसांचा वाद झाला. त्यामुळे जाजू चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी फळभाजी विक्रेता संघाचे शिष्टमंडळ भेटून आले मात्र त्या चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नाही.
राजकीय हस्तक्षेपातून भाजी विक्रेत्यांना हटविण्याचे षडयंत्र
दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी
नगरपरिषद यांनी फळभाजी विक्रेत्यांना उपोषण मागे घेण्यात सांगितले. त्यांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करून नियोजित जागेवर रस्त्याच्या कडेवर
व्यवसाय सुरू करण्यास मौखिक परवानगी दिली. मात्र दुसऱ्या दिवशी प्रशासनामध्ये काय गफलत
झाली. कोणाच्या आदेशावरून परत या फळभाजी विक्रेत्यांना उचलण्याचे षडयंत्र करण्यात आले.
हे राजकीय हस्तक्षेपातून तर होत नाही ना असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे परत फळभाजी विक्रेत्यांना उठविण्यात येत असल्याचा आरोप सुरज खोब्रागडे
यांनी केला.
0 Comments