काय बोलता ! मंत्र्यासह अधिकारी करणार शाळेत मुक्काम

 

यवतमाळ : एरव्ही कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी हे वातानकुलीत ऑफीस व शासकीय निवासस्थानात राहतात. त्यानंतर वातानकुलीत वाहनातूनच त्यांचा प्रवास सुरु होता. पोलीस सुरक्षेसह अधिका-यांची मोठी फौज त्याच्या सोबत असते. आता मंत्री, राज्यमंत्री व अधिकारी चक्क आश्रम शाळेत मुक्काम करणार आहे.

आदिवासी विकास मंत्र्याची संकल्पना

राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करणार आहे. तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय ते मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी मुक्काम करणार असून, सोई-सुविधांची पाहणी करणार आहे. तसेच आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

सात आश्राम शाळेत मुक्काम

पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकुण ७ शासकीय आश्रमशाळा असून त्याठिकाणी अनुसूचित जमातीचे सुमारे २ हजार ५६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सातही आश्रमशाळांमध्ये मंत्रालयीन अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधी, आदिवासी विकास आयुक्तालय, अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी, कार्यालयातील अधिकारी एक दिवस मुक्कामी राहणार आहे.

मंत्री साधणार विद्याथ्यांशी संवाद

राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके व राज्यमंत्री इंद्रनिल नाईक हे राज्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये एक दिवस मुक्कामी थांबणार आहेत. आ.किसनराव वानखेडे हे देखील शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्कामी राहणार अहे. या मुक्कामात आश्रमशाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून अडीअडचणी समजून मुलभुत सोई-सुविधांची पाहणी केली जाणार आहे.

 

Post a Comment

0 Comments