यवतमाळ : दोन
महिन्यापुर्वी टिपेश्वर अभयारण्यातील पिसी वाघिणीच्या गळ्यात
तार अडकला होता. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने त्या वाघिणीचा शोध सुरु होता.
दरम्यान सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी पाटणबोरी वनपरिक्षेत्रातील पिलखान नियतक्षेत्रात
वाघिणीला डॉर्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वाघिणीच्या
गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला. पुढील उपचाराकरिता वाघिणीला
पिंजरा बंद करण्यात आले आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील पिसी वाघिणीच्या गळयात तारेचा फास अडकला असल्याचे दि. 1 फेब्रुवारी रोजी आढळून आले होते. त्या अनुषंगाने दि. 2 फेब्रुवारी पासून सदर वाघिणीचे शोध व बचाव मोहीम चालू होती.
डॉट मारुन केले बेशुद्ध
अमरावती
(प्रा.) वन विभागाअंतर्गत कार्यरत शीघ्र बचाव दल अमोल गावनेर व त्यांच्या चमूने डॉ.
रणजीत नाळे, पशु संवर्धन अधिकारी, पांढरकवडा
यांच्या उपस्थितीत दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास पाटणबोरी वनपरिक्षेत्रातील पिलखान नियतक्षेत्रात वाघिणीला
डॉर्ट मारून यशस्वीरित्या बेशुद्ध केले. वाघिणीच्या गळ्यातील
तारेचा फास काढण्यात आला. पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजरा
बंद करण्यात आले आहे.
औषधोपचार करुन अभयारण्यात सोडणार
डॉ.
रणजीत नाळे, पशु संवर्धन अधिकारी, पांढरकवडा
यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ते औषधोपचार वाघीणीवर करण्यात येत आहेत. औषधोपचार
पूर्ण होताच सदर वाघीणीला अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल
अशी माहिती वनविभागाने दिली.
वनविभागाच्या पथकाने राबविली मोहीम
वाघीणीस फास मुक्त करण्याची मोहीम एम. आदर्श रेड्डी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता डॉ. रणजीत नाळे, पशु संवर्धन अधिकारी, पांढरकवडा, तसेच कौस्तुभ गावंडे, पिपल्स फॉर अनिमल्स, वर्धा व त्यांचा चमू तसेच डॉ. स्वप्नील सोनावणे, युथ फ़ॉर नेचर कंझर्वेशन ऑर्गनझेशन, तसेच धैर्यशील पाटील, उप वनसंरक्षक अमरावती (प्रा.) वन विभाग व त्यांचा अंतर्गत शीघ्र बचाव दल चमू अमोल गावनेर व ईतर, तसेच धनंजय वायभासे, उप वनसंरक्षक, यवतमाळ (प्रा.) वन विभाग (तसेच अतिरिक्त कार्यभार पांढरकवडा (प्रा.) वन विभाग) व त्यांचे शीघ्र बचाव दल तसेच पांढरकवडा (प्रा.) वन विभागातील सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे व विशाल चव्हाण, वनक्षेत्रपाल विजेंद्र दुबे तसेच पांढरकवडा प्रादेशिक वन विभागातील वनरक्षक यांचा चमू, तसेच बी. एन. स्वामी, उप वनसंरक्षक, प्रादेशिक वन विभाग पुसद व त्यांचे शीघ्र बचाव दल आदींनी मोलाचे योगदान दिले. तसेच विभागीय वन अधिकारी उत्तम फड, सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, सहाय्यक वनसंरक्षक भारत खेलबाडे, वनक्षेत्रपाल प्रशांत सोनुले, वनक्षेत्रपाल जगन्नाथ घुगे, वनक्षेत्रपाल धीरज मदने, वनपाल दिपक कुरेकर, वनपाल राजेश कुमरे, वनपाल शशांक सोनटक्के, वनपाल राजेश्वर रणमले तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील सहभागी सर्व वनरक्षक व सर्व वनमजूर यांनी यशस्वीरित्या मोहीम पार पाडली. तसेच या मोहीमेत मानद वन्यजीव रक्षक शाम जोशी व मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
0 Comments