यवतमाळ : पिकअप व मोटरसायकलच्या
अपघातात एक इसम ठार झाला असून, बालकासह एक महिला जखमी झाली. ही घटना आज ४
फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काटखेडा फाट्याजवळ घडली.
अरुण तारा आडे वय 58 वर्षे काटखेडा असे मृतकाचे नाव आहे. तर लिलाबाई अरुण
आडे वय 50 वर्ष, प्रतीक गुरुदत्त आडे वय १ वर्ष अशी जखमींची नावे आहे. मृतक अरुण, त्याची पत्नी
लिलाबाई व नातू प्रतीक हे तीघे एम एच 29 बी आर 4389 क्रमांकाच्या मोटारसायकलने
पुसदकडे जात होते. अशातच गुंज मार्गाने येणा-या सोहेल खान वय
वर्ष अंदाजे 25 रा. दारव्हा याने
आपल्या ताब्यातील एम एच ३७ टी ३४२५ क्रमांकाचे पिकअप वाहन
भरधाव वेगात चालवुन मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात अरुण आडे हा जागीच ठार
झाला. तर त्याची पत्नी लिलाबाई व नातू प्रतीक हा जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी
रुग्णालयात उपचार सुरु आहे. याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून
पंचनामा करुन मृतदेह पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास तपास पी एस आय रवी माधव चव्हाण व सहाय्यक पोलीस राऊत हे करीत आहे.
0 Comments