महागाव तालुक्यातील घटना
यवतमाळ : बिबट्याने कालवडीची शिकार
केल्याची घटना काल सायंकाळी महागाव तालुक्यातील अनंतवाडी शिवारात घडली.
दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अनंतवाडी शिवारात शेतकरी श्याम
कवाने यांच्या शेतात २ वर्षाची कालवडीवर बिबट्याने हल्ला करून
ठार मारले. सदर घटनेची माहिती वन विभागाच्या
अधिका-यांना देण्यात आली. यावेळी वन विभागाचे वनरक्षक जी. जी. शेळके
यांनी पंचनामा करून वन विभागाला अहवाल पाठविला. या बिबट्याच्या
हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments